Saturday 6 September 2014

अलेक्झांदर एक महान जगज्जेत्ता. जवळजवळ संपूर्ण जग जिंकून आपल्या सैन्यासह माघारी आपल्या देशात परतत होता. वापस जाताना तो अतिशय गंभीर आजारी झाला. अनेक उत्कृष्ट उपाय करूनही आजारातून बरे होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. जिंकलेले संपूर्ण साम्राज्ज्य, एवढी मोठी शूर सेना, आपली जगज्जेती तीक्ष्ण तलवार आणी अमाप संपत्ती, ह्या सर्वांचा त्याग करून आपणाला आता मृत्त्युला सामोरे जावे लागणार ह्याची त्याला जाणीव झाली. आपण आता कोणत्याही परिस्थितीत जिवंत आपल्या मायदेशी पोहचू शकत नाही हे त्याला कळून चुकले. मृत्त्युच्या शेवटच्या घटका मोजत असताना त्याने आपल्या सरदाराला पाचारण केले आणी म्हणाला " मी आता लवकरच हे जग सोडून निघून जाणार आहो, माझ्या तीन इच्छा आहेत आणी त्या पूर्ण करण्याची तुमची जबाबदारी आहे" सरदाराला साश्रूपूर्ण होय म्हणण्याशिवाय गत्त्यंतर नव्हते. अलेक्झांदर म्हणाला: १. माझी पहिली इच्छा " माझ्या खाजगी डॉक्टरनेच माझी शवपेटिका एकट्यानेच उचलून न्यावी" २. माझी दुसरी इच्छा " माझी शवपेटिका स्मशानभूमीवर नेण्याच्या संपूर्ण रस्त्यावर मी आतापर्यंत जिंकलेले सर्व सोने, चांदी, जडजवाहीर पसरून ठेवावे" ३. आणि माझी अंतिम इच्छा " माझे दोन्ही हात शवपेटिकेच्या बाहेर काढून लोंबकळत ठेवावे" आपला राजा आपणाला कायमचे सोडून जाणार, सर्व सेना अतिशय दुखी झाली. सरदाराने इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले, तरी देखील हिम्मत करून प्रश्न विचारला " हे राजन, ह्या कसल्या विचित्र इच्छा", राजाने एक दीर्घ श्वास घेतला आणी म्हणाला "माझ्या आयुष्यात मी जे काही आता शिकलो ते सर्व जगाला माहित व्हावे म्हणूनच ह्या तीन इच्छांची पूर्तता करणे गरजेचे आहे" माझ्या खाजगी डॉक्टरनेच माझी शवपेटिका एकट्यानेच उचलून न्यावी ह्यातून मला जगाला एक संदेश द्यावयाचा आहे. जगातील कोणीही उत्कृष्ट डॉक्टर देखील तुम्हाला मरणापासून वाचवू शकत नाही. मरण हे अंतिम सत्य आहे. त्यामुळे जीवन हे गृहीत न धरता ते चांगल्या प्रकारे कोणालाही न दुखावता कसे जगता येईल हा प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. जगज्जेत्ता म्हणून नावलौकिक प्राप्त करण्यासाठी मी आयुष्यभर सतत लढाया केल्या, अपार संपत्ती गोळा केली, पण मरताना मात्र मी काहीच घेवून जाणार नाही, म्हणूनच माझी दुसरी इच्छा " माझी शवपेटिका स्मशानभूमीवर नेण्याच्या संपूर्ण रस्त्यावर मी आतापर्यंत जिंकलेले सर्व सोने, चांदी, जडजवाहीर पसरून ठेवावे" केवळ संपत्ती कोणत्याही प्रकारे जमविणे म्हणजेच जीवन नाही हा संदेश लोकांना मिळेल आणी अशी संपत्ती मिळण्यासाठी केलेली धावाधाव म्हणजेच जीवनातील अमुल्य वेळेचा कालापव्य. जनतेला कळू द्या मी रिकाम्या हातानेच ह्या जगात आलो आणी रिकाम्या हातानेच हे जग सोडून जात आहो, म्हणून माझी तिसरी इच्छा " माझे दोन्ही हात शवपेटिकेच्या बाहेर काढून लोंबकळत ठेवावे" हे सर्व सांगून थोड्याच वेळात त्याचा मृत्त्यू झाला. नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया जेव्हा काळाची ऊडी पडेल तेव्हा कोणीही वाचवू शकत नाही सगळ ईथेच ठेवुन जायचे आहे एक माणुस म्हणुन या संसारात वागा चांगली कर्मे करा

No comments:

Post a Comment