Saturday, 6 September 2014
Motivational Story..... एका गावात एक विद्वान अर्थतज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...तिथल्या स्थानिक गावाच्या राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले . तो विद्वान राजाला भेटायला गेला . भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा त्या विद्वानाला म्हणाला " महाशय तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ? काही त्याला शिकवा त्याला सोने आणि चांदी यात जास्त मुल्यवान काय साधे ईतके सुध्दा कळत नाही " आणि मोठ्याने हसू लागला हे ऐकून त्या विदवानाला फार वाईट वाटले ... तो घरी गेला .... त्याने मुलाला विचारले " बाळा मुलवान काय आहे सोने का चांदी ? " " सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला " हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ? म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..! त्याने तुझ्यावर असला आरोप का लावला . या आधीपण लोकं माला या बाबी बरुन हसायचे पण आता माझी चार लोकात खिल्ली उडवली जाते .. तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे मग लोकं असे का करतात सांग माला" " लोकांवर रुबाब करायसाठी आणि प्रतिष्ठा जपायसाठी राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ... रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे मी दिसताचं राजा माला बोलबून घेतो .. त्याच्या सोबत गावातील सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात .... राजा एका हातात सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर धरतो आणि माला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल .. आणि मी चांदीचे नाणे उचलतो .. त्यामुळे तिथे असलेले सगळे मोठ्याने हसतात ... सार्यांना मजा वाटते ....... असे रोज घडते पण माला सोने आणि चांदी याचे मुल्य कळत नाही असे त्यांनी तुम्हाला का सांगीतले माला खरचं माहीत नाही ......." विद्वान मुलाचे हे उत्तर ऐकून खूप विचारात पडला मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही न राहून त्याने मुलाला विचारले " मग तु झोन्याचे नाणे का उचलत नाही ? असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?" मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेला कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली ती पेटी चांदीच्या नाण्यांनी भरलेली होती हे पाहून विद्वान अवाकचं झाला .. मुलगा म्हणाला " ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल .. त्यांना माला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल तर येवू द्या .. पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा माला काहीचं मिळणार नाही मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे " जीवनातही असे बर्याचं वेळा होते कोणाला मुर्खात काढायसाठी आपण विनाकारण आपले नुकसान करुन घेतो .. आणि कधी कोणी विनाकारण आपणास मुर्खात काढते पण त्यातून आपला फायदाचं होतो हा एक खेळचं असतो कोणी हरत जिंकते आणि कोणी फक्त जिंकते ..... कोणी जिंकताना दिसते आणि कोणी न दिसताचं जिंकते ...... कोणत्याही बाजूला राहून खेळा ... मात्र नेहमीचं सकारात्मक असा..... कोणी आपणास किती ही मुर्खात काढाले तरी उगाच मनाला त्रास नका करुन घेवू ... त्या गोष्टीला सकारात्मकते ने सामोरे जा आणि सोन्याची एक संधी साधाय पेक्षा प्रत्येक संधीतचे सोने करा ... काय वाटते ???? असेचं काही किंवा काहीचं नाही बाकी सारे शून्य ... Vel asel tar nichit waccha
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment